मुंबई -परभणीचे शिवसेना खासदार संजय जाधव यांनी राजीनामा कोणाकडे दिला, असा सवाल नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला. तसेच जाधव हे नाराज नसून त्यांनी आपल्या खासदारकीचा कोणताही राजीनामा दिला नव्हता, असा खुलासाही त्यांनी यावेळी केला.
खासदार संजय जाधव यांनी राजीनामा दिलाच नाही, एकनाथ शिंदे यांचा खुलासा - खासदार जाधवांच्या राजीनाम्यावर एकनाथ शिंदे
शिवसेनेचे परभणी जिल्ह्यातील खासदार संजय जाधव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. यावेळी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे आदी नेते उपस्थित होते. या बैठकीनंतर शिंदे यांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितले की, राजीनामा दिलाच नाही. याविषयी चुकीचे वृत्त माध्यमात आले आणि ते व्हायरल झाले. त्यामुळे त्यांनी दिलेल्या राजीनाम्याचा मागे घेण्याचा विषयच नाही, असा खुलासाही शिंदे यांनी केला.

शिंदे पुढे म्हणाले की, खासदार संजय जाधव माझ्यासमोर मुख्यमंत्र्यांना भेटले. त्यांची कामे मुख्यमंत्री महोदयांच्या कानावर घातली आहेत. त्यांची कामे करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. त्यामुळे त्यांची नाराजी कुठे जाणवली नाही. शिवाय कुठलीही तक्रार अथवा नाराजी त्यांनी बोलून दाखवली नाही. त्यांनी केवळ त्यांच्या मतदार संघातील कामे-विषय मुखमंत्र्यांसमोर मांडले. मुख्यमंत्र्यांनाही आपल्या खासदाराच्या कामाच्या बाबतीत काही सूचना सबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. ज्या ठिकाणी शिवसेनेचे आमदार-खासदार हे एकत्र आहेत, त्या ठिकाणी निर्णय घेण्याचे सूत्र ठरले आहे. खासदार संजय जाधव यांच्याप्रमाणे निंर्णय करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यानी केल्या, अशी माहिती शिंदे यांनी यावेळी दिली.