मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर लिहलेल्या वादग्रस्त पुस्तकावरुन भाजपवर चांगलीच टीका होत आहे. या प्रकारावर वेगवेगळ्या पक्षाचे राजकीय नेते विधाने करत आहेत. अशातच शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी या प्रकाराचा निषेध नोंदवत, भाजपमध्ये शिरलेल्या छत्रपतींच्या वंशजांना हा प्रकार मान्य आहे का? असा सवाल केला आहे. या त्यांच्या वक्तव्यावर खासदार छत्रपती संभाजीराजे चांगलेच संतापले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदींशी करणारे पुस्तक आज (रविवार) भाजपने प्रकाशीत केले आहे. या प्रकाराबद्दल छत्रपतींच्या वंशजांनी बोलावे, असे विधान संजय राऊत यांनी ट्वीटरवर केले होते. त्यांच्या या विधानाचा संभाजीराजेंनी चांगलाच समाचार घेतला आहे. उद्धवजी त्या संजय राऊतांच्या जिभेला लगाम घाला. प्रत्येक वेळी छत्रपती घरण्यावर गरळ ओकून राजकारण करतोय. त्याची मुजोरी सहन केली जाणार नाही, असे विधान संभाजीराजेंनी ट्वीटरवर केले आहे. त्यामुळे आता राजकीय वातावरण चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.