महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

संभाजीराजे राज ठाकरेंच्या भेटीला

संभाजीराजे छत्रपती गुरुवारी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. मराठा आरक्षणावर राज ठाकरे यांची नेमकी काय भूमिका आहे, हे जाणून घ्यायचा संभाजीराजे यांनी भेट घेतली आहे.

संभाजीराजे राज ठाकरे भेट
संभाजीराजे राज ठाकरे भेट

By

Published : May 27, 2021, 7:45 PM IST

मुंबई -गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी राज्यभरातील अभ्यासक, जाणकार आणि नेत्यांच्या गाठीभेटी घेत असलेले संभाजीराजे छत्रपती गुरुवारी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. मराठा आरक्षणावर राज ठाकरे यांची नेमकी काय भूमिका आहे, हे जाणून घ्यायचा संभाजीराजे यांनी भेट घेतली आहे.

'...म्हणून मी सगळ्या पक्षांच्या प्रमुखांना भेटत आहे'
मराठा समाजाला न्याय मिळावा म्हणून मी सगळ्या पक्षांच्या प्रमुखांना भेटत आहे. सकाळी मी पवार साहेबांना भेटलो आता मनसे प्रमुख राज ठाकरें यांची भेट घेतली. उद्या मुख्यमंत्र्यांनाही भेटणार आहे. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली आहे. पण त्यातून आता मार्ग कसा काढायचा आणि समाजाला न्याय कसा मिळायला हवा यावर आजची चर्चा झाली आहे.

'राज ठाकरे जात पात मानत नाहीत'

राज ठाकरे जात पात मानत नाहीत. त्यांची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. पण गरीब आणि गरजू मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे ही त्यांची भूमिका आहे. गडकिल्ल्यांचे संवर्धन यावरही आम्ही चर्चा केली. हा दोघांचा मुद्दा महत्वाचं आहे. उद्या 12 वाजता फडणवीस यांची भेट घेणार असून 1 वाजता मुख्यमंत्र्यांची भेट घेईन आणि त्यानंतर मी माझी भूमिका स्पष्ट करेन. परवा प्रकाश आंबेडकरांची भेट घेणार असल्याचे संभाजी राजे यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details