महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सध्याची राजकीय अस्थिरता परवडणार नाही, प्रमुख पक्षांनी सरकार स्थापन करावे - संभाजीराजे

सध्या राज्यात चालू असलेल्या राजकीय स्थितीवर खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी चिंता व्यक्त केली आहे. राज्यात अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत, त्यामुळे ही राजकीय अस्थिरता परवडणारी नसल्याचे वक्तव्य संभाजीराजेंनी केले आहे.

संभाजीराजे

By

Published : Nov 14, 2019, 8:24 PM IST

मुंबई - सध्या राज्यात चालू असलेल्या राजकीय स्थितीवर खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी चिंता व्यक्त केली आहे. राज्यात अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत, त्यामुळे ही राजकीय अस्थिरता परवडणारी नसल्याचे वक्तव्य संभाजीराजेंनी केले आहे. त्यामुळे राज्यातील प्रमुख पक्षांनी एकत्र येऊन मार्ग काढावा व स्थिर सरकार स्थापन करावे असेही संभाजीराजे म्हणाले.


संभाजीराजेंनी ट्वीटरच्या माध्यमातून सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला राष्ट्रपती राजवटीला सामोरे जावे लागते हे अतिशय चिंताजनक असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्राच्या जनतेने सर्वच पक्षांना अत्यंत विश्वासाने मतदान करून जनादेश दिला आहे. त्या लोकभावनेचा आदर केला गेला पाहिजे, असेही संभाजीराजे म्हणाले.


महाराष्ट्रातील शेतकरी अभूतपूर्व संकटातून जात आहे. अनेक कारणांमुळे युवक नैराश्यात आहेत. अनेक प्रश्न राज्यसमोर आ वासून उभे असताना, ही राजकीय अस्थिरता परवडणारी नसल्याचे संभाजीराजे म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details