शिवसेनेच्या राहुल शेवाळेंनी खासदारकीचे पाहिले वेतन दिले दुष्काळग्रस्तांसाठी - दक्षिण- मध्य मुंबईचे
खासदार शेवाळे यांनी लोकसभेच्या लेखा विभागाला एक पत्र लिहून आपले एक महिन्याचे वेतन महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'मध्ये जमा करावे, अशी विनंती केली आहे.
खा. राहूल शेवाळे यांनी लेखा विभागाला पाठविलेले पत्र
मुंबई - महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागात शिवसेनेच्या वतीने मदतकार्य सूरु आहे. याच पाश्वभूमीवर दक्षिण- मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांनी आपले खासदराकीचे पहिले वेतन दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकसभेच्या लेखा विभागाला एक पत्र लिहून आपले एक महिन्याचे वेतन महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'मध्ये जमा करावे, अशी विनंती खासदार शेवाळे यांनी केली आहे.