मुंबई- कोरोना संकटामुळे अनेक रुग्णालयांत मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर, खासदार राहुल शेवाळे यांनी, रक्तदान करुन आज आपला वाढदिवस साजरा केला. श्री सिद्धिविनायक मंदिर न्यास आणि स्वतः खासदार शेवाळे यांच्या पुढाकाराने मानखुर्द येथे आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरात सामाजिक अंतराचे काटेकोरपणे पालन करत अनेकांनी रक्तदानाचे कर्तव्य बजावले.
यावेळी, विभागप्रमुख मंगेश सातमकर, अणुशक्तीनगर विधानसभा संघटक निमिष भोसले आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
रक्तदान करून खासदार राहुल शेवाळे यांनी साजरा केला वाढदिवस
खासदार राहुल शेवाळे यांनी, रक्तदान करुन आज आपला वाढदिवस साजरा केला. त्याचबरोबर आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असून सर्वांनी घरात राहून जयंती साजरी करा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
खासदार राहुल शेवाळे व रक्तदाता
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती हा दिवस माझ्यासह देशभरातील करोडो अनुयायांसाठी आनंददायी सोहळा ठरतो. पण, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण लॉकडाऊनचे नियम पाळत घरीच राहूया आणि महामानावाची जयंती साजरी करुया, कायद्याचे पालन करुन राजघटनेच्या शिल्पकाराला अभिवादन करूया, अशा शब्दांत खासदार राहुल शेवाळे यांनी जनतेला आवाहन केले.
हेही वाचा -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर कारवाई