महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आषाढीनिमित्त विठ्ठल दर्शनासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोलमाफी द्या - खा. शेवाळे - Alpesh Karkare

आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठुरायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोलमाफी द्यावी, अशी लेखी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

संपादीत छायाचित्र

By

Published : Jul 8, 2019, 4:41 PM IST

Updated : Jul 8, 2019, 5:05 PM IST

मुंबई- आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठुरायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोलमाफी द्यावी, अशी लेखी मागणी दक्षिण-मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

ज्ञानोबा माऊलींची पालखी


आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर विठु माऊलीच्या दर्शनासाठी दरवर्षी राज्यासह देशभरातून हजारो वारकरी पंढरपुरात दाखल होतात. आषाढी एकादशीची ही परंपरा महाराष्ट्राच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक जडणघडणीचे अविभाज्य अंग आहे. यंदाही १२ जुलै रोजी होणाऱ्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने राज्यभरातून वारकरी पंढरपूरच्या दिशेने रवाना होत आहेत. त्यामुळे या वारकऱ्यांच्या वाहनांना एकादशीच्या काळात टोलमाफी देण्याची मागणी खासदार शेवाळे यांनी मुख्यमंत्री, रस्ते व विकास मंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.

Last Updated : Jul 8, 2019, 5:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details