महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिवाजीनगरमधील कोविड लसीकरण केंद्राला खासदार मनोज कोटक यांनी दिली भेट - Kotak Visit Shivajinagar Vaccination Center

भाजप खासदार मनोज कोटक यांनी आज दुपारी गोवंडी येथील शिवजीनगरमधील लसीकरण केंद्राला भेट दिली. यावेळी कोविड केंद्रामध्ये डॉक्टर, आरोग्य कर्मचारी व रुग्णांशी मनोज कोटक यांनी संवाद साधत सर्वांचे मनोबल वाढवले.

Shivaji Nagar Vaccination Center Manoj Kotak Visit
शिवाजी नगर लसीकरण केंद्र भेट मनोज कोटक

By

Published : Apr 20, 2021, 10:05 PM IST

मुंबई -भाजप खासदार मनोज कोटक यांनी आज दुपारी गोवंडी येथील शिवजीनगरमधील लसीकरण केंद्राला भेट दिली. यावेळी कोविड केंद्रामध्ये डॉक्टर, आरोग्य कर्मचारी व रुग्णांशी मनोज कोटक यांनी संवाद साधत सर्वांचे मनोबल वाढवले.

माहिती देताना भाजप खासदार मनोज कोटक

हेही वाचा -राज्यात 62 हजार 97 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ, 519 रुग्णांचा मृत्यू

पंतप्रधानांनी १८ वर्ष वयोगटावरील सर्व व्यक्तींचे १ मे पासून मोफत कोविड लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवजीनगरमधील कोविड लसीकरण केंद्र कसे काम करते, याची पाहणी करण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत. जेव्हा एक तारखेला लसीकरण सुरू होईल तेव्हा काय काय तयारी करावी लागेल, या संदर्भात चर्चा करण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत, असे कोटक यांनी सांगितले.

कोविड लसीची कमतरता असल्यामुळे शताब्दी रुग्णालयात काही लोकांना पाठवले होते. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांसोबत माझी आज चर्चा झाली आहे. सर्व रुग्णालयांत व्यवस्थित डोस पुरवले जातील, असा विश्वास त्यांनी मला विश्वास दिला, असे खासदार मनोज कोटक यांनी सांगितले.

हेही वाचा -राज्यातील रिक्षा परवानाधारकांसाठी 107 कोटी सानुग्रह अनुदान जाहीर

ABOUT THE AUTHOR

...view details