मुंबई - घाटकोपर अंधेरी जोडरस्त्याशी सलग्न असणाऱ्या अमृतनगरकडे जाणाऱ्या गोळीबार रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. ही कोंडी सोडवण्यासाठी सोमवारी ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक यांनी याठिकाणी पाहणी दौरा केला. यावेळी वाहतूक विभागाच्या आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांना वाहतूक कोंडी लवकरात लवकर सोडवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.
मुंबई: घाटकोपरची वाहतूक कोंडी टाळण्यासाठी खासदारांनी दिले पालिका अधिकाऱ्यांना सूचना - घाटकोपर
कुर्ला ते मुलुंड पर्यंतचा एलबीएस मार्ग, घाटकोपर पश्चिम येथील गोळीबार रोड, घाटकोपर अंधेरी लिंक मार्गावर अनेक ठिकाणी सकाळी आणि सध्याकाळच्या वेळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. ती टाळण्यासाठी खासदार मनोज कोटकांनी येथील अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
कुर्ला ते मुलुंड पर्यंतचा एलबीएस मार्ग, घाटकोपर पश्चिम येथील गोळीबार रोड, घाटकोपर अंधेरी लिंक मार्गावरील अनधिकृत बांधकामे, गोळीबार मार्गावरील अनधिकृत दुकाने यांच्यावर पालिकेने तात्काळ कारवाई करून सदर रस्त्याचे रुंदीकरण करून वाहतूकीची व्यवस्था सुरळीत करावी, अशी सूचना पालिका अधिकाऱ्यांना कोटक यांनी दिली. यानंतर पालिका प्रशासनाने 15 दिवसांची वेळ मागीतली आहे. घाटकोपर ते वर्सोवा या पहिल्या टप्यातील मेट्रो मार्गामुळे गोळीबार मार्गाचा 200 मीटरचा रस्ता अरुंद झाला आहे. तसेच या मार्गावरील वाहतूक दुतर्फा होत असल्याने सकाळ आणि सांयकाळच्या वेळी येथे वाहतूक कोंडी होते. तसेच घाटकोपर अंधेरी लिंक रोड, गोळीबार रोड ते जगदुशा नगर येथील अनधिकृत दुकानामुळे अमृतनगर येथून स्टेशनकडे जाणाऱ्या वाहनांना गोळीबार मार्गावर वाहतूक करताना अडचणी येतात. दरम्यान, गोळीबार मार्गापासून श्रेयस सिग्नलकडे जाताना बसेसला या रस्त्यावरून वळण घेताना अडचणी निर्माण होतात. या मुख्य मार्गावरील अडचणी खासदार मनोज कोटक यांनी यावेळी पालिका अधिकारीऱ्यांच्या निदर्शनात आणून देत या मार्गावरील वाहतूक कोडीची समस्या लवकर सोडवावी निर्देश दिले. यावेळी वाहतूक पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे, एन वार्ड पालिका अधिकारी के. बी. गांधी उपस्थित होते.
हेही वाचा -'इथे आले, मंत्रीपद गेले', शेगावची आख्यायिका खरी ठरणार?