मुंबई - मुंबईत देशभरातून येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या येत असताना मुंबईतील उपनगरीय रेल्वे लोकल सेवेवर त्याचा परिणाम होतो. गर्दीमुळे लोकल सेवा बाधित होते, यामुळे वांद्रे टर्मिनस येथील लांब पल्ल्याच्या गाड्यांचा भार कमी करून तो जोगेश्वरी येथेच परस्पर थांबविण्यात प्रयत्न करण्यात येत आहेत. या मतदारसंघातील खासदार गजानन किर्तीकर ( MP Gajanan Kirtikar ) यांनीही जोगेश्वरी रेल्वे टर्मिनल ( Mumbai Jogeshwari Terminus ) बाबत सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यानुसार रेल्वेने जोगेश्वरी टर्मिनल प्रकल्पाला मंजुरी ( Approval for Jogeshwari Terminal Project ) सुद्धा दिली आहे नुकतीच जोगेश्वरी टर्मिनसच्या 69 कोटींच्या कामाला रेल्वे बोर्डाच्या संचालक पंकज कुमार यांनी मंजुरी देऊन रेल्वेच्या आर्थिक संचालकांकडे हा विषय पाठवला होता.
कीर्तीकरांची संसदेत निधीची मागणी -मात्र निधी अभावी जोगेश्वरी रेल्वे टर्मिनलचे काम संथ गतीने सुरू असल्याने रेल्वे टर्मिनलसाठी केंद्र सरकारने जास्तीत जास्त निधी द्यावा, यासाठी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे खासदार गजानन कीर्तिकर ( Demand for funding for Mumbai Jogeshwari Terminus ) यांनी संसदेत हा प्रश्न लावून धरला. या रेल्वे टर्मिनल साठी अधिक निधी देण्यात यावा अशी मागणी त्यांनी आज केंद्राकडे केली आहे. हे टर्मिनल लवकरात लवकर पूर्ण झाल्यास पश्चिम उपनगरीय लोकल रेल्वे सेवेवरचा ताण कमी होईल असा दावाही त्यांनी केला.