मुंबई -मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पंतप्रधानांची भेट घेतली. या भेटी व्यतिरिक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात स्वतंत्र बैठक, अर्धा तास चर्चा झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावर बोलताना शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी सांगितले, की समाजकारण म्हणून मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांची वैयक्तिक भेट झाली असावी, पण नक्की चार भिंतीत काय झाले या विषयी अधिक भाष्य करता येणार नाही.
अनेक वर्षापासून भाजपा बरोबर संबंध
राजकीय नाते नाही, आम्ही वैयक्तिक नाते संबंध जपणारी माणसं आहोत, अनेक वर्षापासून भाजपाबरोबर संबंध होते, हे नाकारता येत नाही. पण आता समाजकारण म्हणून मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांची वैयक्तिक भेट झाली असावी, पण नक्की चार भिंतीत काय झाले या विषयी अधिक भाष्य करता येणार नाही, असे सावंत यांनी भेटीविषयी सांगितले.