मुंबई- कोरोनाच्या महाभयंकर संकटात पोलीस जिवाची बाजी लावून मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र आपले कर्तव्य बजावत आहेत. अशात पोलिसांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यामुळे, मोटार वाहन विभागातील पोलीस कर्मचाऱ्यांना दक्षिण मुंबईचे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांच्याकडून 200 मास्क, फेसशिल्ड आणि हँडग्लोज उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
मोटार वाहन विभागातील पोलीस कर्मचाऱ्यांना खासदार अरविंद सावंतांची मदत, मास्कचे वाटप
कोरोनाच्या महाभयंकर संकटात पोलीस जिवाची बाजी लावून मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र आपले कर्तव्य बजावत आहेत. यामुळे, मोटार वाहन विभागातील पोलीस कर्मचाऱ्यांना दक्षिण मुंबईचे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांच्याकडून 200 मास्क, फेसशिल्ड आणि हँडग्लोज उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
पोलीस पत्नी एकता मंचच्या संस्थापक अध्यक्ष जानवी भगत यांनी पोलीस मोटार वाहन विभागातील वाहन चालकांची व्यथा अरविंद सावंत यांच्याकडे मांडली होती. पोलीस वाहनावरील वाहन चालकांना उत्तम दर्जाचे हँडग्लोज, फेसशिल्ड व मास्कची गरज आहे. आपण सहकार्य करावे, अशा आशयाचा एक मेल अरविंद सावंत यांना पाठवण्यात आला होता. अरविंद सावंत यांनी त्याची दखल घेत नागपाडा विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त परिवहन विभाग अतुल पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील जाधव यांची भेट घेऊन सदर साहित्य त्यांच्या स्वाधीन केले.