मुंबई - राज्यातील महाराष्ट्र राज्य सुरक्षारक्षक संघटनेने विविध मागण्यांसाठी आझाद मैदान येथे आंदोलन केले आहे. राज्यातील 14 सुरक्षा रक्षक मंडळ यांचे एकीकरण करावे, पगार वाढ, उत्तम दर्जाचा खाकी गणवेश असावा, आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघाच्या वतीने आज आझाद मैदान येथे अधिवेशनाच्या दुसऱ्या या दिवशी आंदोलन करण्यात आलेले आहे. मागील चार वेळा सुरक्षारक्षकांनी आंदोलन केले. मात्र, सरकारने त्यांना फक्त आश्वासने दिली. पूर्तता केली नाही. त्यामुळे, यावेळी ठोस लेखी आश्वासन दिले तरच आंदोलन मागे घेऊ असे महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक संघटनेचे सचिव विशाल कांबळे यांनी सांगितले .
राज्यातील सुरक्षा रक्षक मंडळातील रक्षकांना खाकी गणवेश देण्याबाबतचा निर्णय राज्य सुरक्षा रक्षक सल्लागार मंडळाच्या बैठकीत सरकारने दिला. परंतु, त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. इतर मागण्यांसाठी देखील मुख्यमंत्र्यांची मागे भेट झाली. त्यांनी तुमच्या मागण्या मान्य होतील, असा शब्द दिला होते. परंतु, त्या त्यांनी मागण्यांकडे गेल्या चार वर्षात लक्ष दिले नाही.