मुंबई-चेंबूर येथील पेस्तम सागर परिसरातील नवभारत सोसायटीत रहाणाऱ्या एका 70 वर्षीय महिलेची हत्या झाली होती. 13 जुलैला झालेल्या या घटनेतील आरोपीला शोधण्यास पोलिसांना यश आले आहे. महिलेच्या सुनेनेच हत्या केली असल्याचे तपासात समोर आले आहे. अंजना दिनेश पाटील असे आरोपी सुनेचे नाव आहे.
'त्या' महिलेच्या हत्येचे गूढ उकलले.. सुनेनेच केली हत्या - मुंबई पोलीस बातमी
सासू आपल्याला चोर बोलते, हिनावते म्हणून सुनेने सासूच्या डोक्यात बॅट घालून गळा आवळला होता. त्यानंतर सासूला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपारापुर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
सजाबाई धोंडीराम पाटील यांची 13 जुलै रोजी हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. पोलिसांनी या प्रकरणात मोठ्या शिताफिने तपास केला असून यात मृत महिलेची सुनच आरोपी असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी अंजनाला अटक केली असून आरोपीनेही हत्येची कबुली दिली आहे.
सासू आपल्याला चोर बोलते, हिनावते म्हणून सुनेने सासूच्या डोक्यात बॅट घालून गळा आवळला होता. त्यानंतर सासूला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपारापुर्वीच त्यांचा मृत्यू झाला. नातेवाईकांनी पोलिसांना सजाबाई घरात पाय घसरुन पडल्या असल्याचे सांगितले. मात्र, एकूणच डोक्यावरील खोल जखमा पाहता पोलिसांना या महिलेची हत्या झाल्याचा संशय होता. या प्रकरणी टिळक नगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंद करुन तपास सुरू केला होता.