महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उद्धव ठाकरेंनी प्रस्थापितांना डावलत नवख्यांना दिली मंत्रिमंडळात संधी - first time elected MLAs became ministers

आज झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात सर्वाधिक बदल हे शिवसेनेत झाले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षांतर्गत काही धाडसी निर्णय घेतले आहेत. महाराष्ट्रात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी शिवसेनेच्या पक्षातील प्रस्थापितांना दूर करत गावपाड्यातून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना उद्धव ठाकरे यांनी यावेळी मंत्रिमंडळात संधी दिली आहे.

minister from Shivsena
उद्धव ठाकरेंनी प्रस्थापितांना डावलत नवख्यांना दिली मंत्रीमंडळात संधी

By

Published : Dec 30, 2019, 2:58 PM IST

मुंबई- आज झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात सर्वाधिक बदल हे शिवसेनेत झाले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षांतर्गत काही धाडसी निर्णय घेतले आहेत. महाराष्ट्रात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी शिवसेनेच्या पक्षातील प्रस्थापितांना दूर करत गावपाड्यातून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना उद्धव ठाकरे यांनी यावेळी मंत्रिमंडळात संधी दिली आहे.

आज मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेकडून शहरी भागातील दिग्गज आमदारांना बाजूला सारून ग्रामीण भागातील नव्या चेहऱ्यांना मंत्री म्हणून शपथ घेण्यासाठी निमंत्रित केले आहे. मुंबई आणि ठाणे सारख्या शहरातून फक्त विधान परिषदेचे आमदार अनिल परब यांनाच संधी दिली आहे. शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला असणाऱ्या कोकणातून रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांना संधी देण्यात आली आहे.

यावेळच्या मंत्रिमंडळात शिवसेनेने ग्रामीण भागातून निवडून येणाऱ्या आमदारांना सर्वाधिक संधी दिली आहे. ज्या अपक्ष आमदारांनी शिवसेनेला विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर जाहीर पाठिंबा दिला होता, त्यांचाही या मंत्रिमंडळात समावेश आहे. अपक्ष आमदार शंकरराव गडाख व प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांचा मंत्रिमंडळात समावेश आहे.

दिवाकर रावते, रामदास कदम, तानाजी सावंत, रविंद्र वायकर, दिपक केसरकर या माजी मंत्री असलेल्या दिग्गज आमदारांना शिवसेनेने वगळले आहे.

शिवसेनेने मंत्रिमंडळात स्थान दिलेले आमदार -

गुलाबराव पाटील , संजय राठोड, दादा भुसे

अनिल परब, शंभूराजे देसाई, उदय सामंत

बच्चू कडू , अब्दूल सत्तार, संदिपान भुमरे

राजेंद्र पाटील-येड्रावकर, शंकरराव गडाख

ABOUT THE AUTHOR

...view details