Loksabha Election Live : ५ व्या टप्प्यासाठी ७ राज्यांमधील ५१ मतदार संघांमध्ये मतदान सुरू
नवी दिल्ली - लोकसभेसाठी ५ व्या टप्प्यातील मतदान आज सुरू झाले आहे. उत्तर प्रदेश, राजस्थान, जम्मू-काश्मीर, बिहार, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, झारखंड या ७ राज्यांमधील ५१ मतदारसंघांमध्ये मतदान सुरू आहे. यात उत्तर प्रदेशातील सर्वाधिक १४ लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे.
सविस्तर वृत्त - http://bit.ly/2H1NCuN
आज मुंबईत मराठा मोर्चा धडकणार मंत्रालयावर
मुंबई - उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नुकताच एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. त्यानुसार दंतवैद्यक आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना आरक्षणाचा लाभ मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. याविरोधात सरकारने हस्तक्षेप करावा या मागणीसाठी मराठा समाजाचा मोर्चा सोमवारी मुंबईमध्ये मत्रालयावर धडकणार आहे.
सविस्तर वृत्त - http://bit.ly/2LmMZ4w
लातुरात पिकअप व्हॅन आणि ट्रकची धडक, माय-लेकासह पाच जणांचा मृत्यू
लातूर - लग्नाहून परतणाऱ्या पीकअप व्हॅनला आयशर टेम्पोने हुलकावणी दिली. ही पिकअप व्हॅन थेट समोरून येणाऱ्या ट्रकवर धडकली. या भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर ६ जण गंभीर जखमी झाले आहेत.
सविस्तर वृत्त - http://bit.ly/2VhVMcD
मंत्र्यांचे दौरे नको, दुष्काळग्रस्तांना न्याय द्या, अन्यथा रस्त्यावर उतरू - राजू शेट्टी
सांगली - नुसते मत्र्यांचे दौरे नको, दुष्काळग्रस्तांना न्याय द्या, अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी सरकारला दिला आहे. तर सरकारच्या कार्यक्षमतेमुळे आज दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची अवस्था वाईट झाली असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. आचारसंहितेचे कारण पुढे करून शासना ढिम्म झाले आहे, असा आरोपही शेट्टी यांनी केला आहे. ते सांगलीत बोलत होते.
सविस्तर वृत्त -http://bit.ly/2vF8Olm
'तुला काहीही सिद्ध करण्याची आवश्यकता नाही', अनुपम खेर यांचा अक्षय कुमारला पाठिंबा
मुंबई - अक्षय कुमारच्या नागरिकत्वाबाबत सध्या सोशल मीडियामध्ये चर्चेला उधाण आले आहे. अक्षय कुमार भारतीय नाही, तर कॅनेडीयन आहे. मग त्याला राष्ट्रीय पुरस्कार कसा देण्यात आला, असे प्रश्न विचारले जात आहेत. या सर्व चर्चांवर अक्षयने सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट करून नेटकऱ्यांना स्पष्ट उत्तरही दिले होते. तरीही त्याच्या नागरिकत्वाच्या मुद्दयावरून सोशल मीडियामध्ये वादंग सुरूच आहे. त्यामुळे बॉलिवूडचे ज्येष्ठ नेते अनुपम खेर हे अक्षयच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. ट्विटरद्वारे त्यांनी अक्षयला पाठिंबा दिला आहे.
सविस्तर वृत्त - http://bit.ly/2GYAsig