महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आज..आत्ता..सकाळी ९ वाजेपर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडींवर एक नजर.. - etv bharat

मालेगाव बस स्थानकात उभ्या असलेल्या एसटी बसला आग, जीवित हानी नाही. वैद्यकीय प्रवेश: सरकारला तातडीने पावले उचलावी लागतील, शिवसेना सरकारला सल्ला. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसचा रास्तारोको; घोषणाबाजीने दणाणला परिसर. सीबीआयचे २२ शैक्षणिक संस्थांवर छापे; कोट्यवधींचा शिष्यवृत्ती घोटाळा झाल्याची शक्यता. यवतमाळ जिल्ह्यातील सरपंचांसोबत मुख्यमंत्र्यांनी ‘ऑडिओ ब्रीज’च्या माध्यमाने साधला संवाद.

महत्त्वाच्या घडामोडी

By

Published : May 14, 2019, 9:15 AM IST

मालेगाव बस स्थानकात उभ्या असलेल्या एसटी बसला आग, जीवित हानी नाही

नाशिक - मालेगाव येथील नवीन बस स्थानकावर उभ्या असलेल्या सटाणा आगाराच्या एसटी बसने अचानक पेट घेतला. सोमवारी (१३ मे) मध्यरात्री अचानक ही आग लागल्याने सर्वत्र धावपळ उडाली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. वाचा सविस्तर...


वैद्यकीय प्रवेश: सरकारला तातडीने पावले उचलावी लागतील, शिवसेना सरकारला सल्ला

मुंबई - वैद्यकीय आणि दंतवैद्यक पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या यंदाच्या प्रवेशांसंदर्भात निर्माण झालेला मराठा आरक्षणाचा पेच सुटावा, यासाठी सरकारला तातडीने पावले उचलावी लागतील, असा सल्ला शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून सरकारला दिला आहे. याचबरोबर अध्यादेश काढून ही कोंडी सोडविण्याच्या पर्यायाचाही सरकारी पातळीवर गांभीर्याने विचार केला जात आहे, असेही या अग्रलेखात म्हणण्यात आले आहे. वाचा सविस्तर...


शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसचा रास्तारोको; घोषणाबाजीने दणाणला परिसर

औरंगाबाद - शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसने पैठण शेवगाव रोडवरील शहागड फाट्यावर रास्तारोको आंदोलन केले. यावेळी काँग्रेसच्या नेत्यांनी सरकारविरोधी केलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. वाचा सविस्तर...


सीबीआयचे २२ शैक्षणिक संस्थांवर छापे; कोट्यवधींचा शिष्यवृत्ती घोटाळा झाल्याची शक्यता

नवी दिल्ली - पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि चंदीगड या राज्यांमधील विविध २२ शैक्षणिक संस्थांवर सीबीआयकडून छापे टाकण्यात आले. येथे शिष्यवृत्तीशी संबंधित कोट्यवधींचा घोटाळा झाला असल्याचा संशय आहे. वाचा सविस्तर...


यवतमाळ जिल्ह्यातील सरपंचांसोबत मुख्यमंत्र्यांनी ‘ऑडिओ ब्रीज’च्या माध्यमाने साधला संवाद

यवतमाळ - ग्रामस्थांना पिण्यासाठी पाणी, हाताला काम आणि जनावरांना चारा-छावणी मिळेल, असे नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यवतमाळ जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी आज वर्षा निवासस्थानी ऑडिओ ब्रीजच्या माध्यमातून यवतमाळ जिल्ह्यातील सरपंचांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पाणी टंचाई आणि रोजगार हमी योजनेच्या कामाचा आढावा घेतला.वाचा सविस्तर...

ABOUT THE AUTHOR

...view details