महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आज...आत्ता...शनिवारी सकाळी ९ पर्यंतच्या महत्वाच्या घडामोडींवर एक नजर...

पुण्यातील कोंढवा येथे भिंत कोसळून १४ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे, तर या घटनेमधील मृतांच्या नातेवाईकांना मदत करणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. योगी सरकारने अनुसूचित जातींच्या यादीत १७ ओबीसी जातींचा समावेश केला आहे. शिवाय अकरावी प्रवेशासाठी आयसीएसई मंडळाच्या विद्यार्थ्यांचे ५ विषयाचेच गुण ग्राह्य धरणार असल्याचे शिक्षण मंत्री म्हणाले, तर पुनर्विकास प्रकल्पात भाडेकरूंना सलग ३ वर्षांचे घरभाडे मिळण्याबाबत निर्णय घेणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी

By

Published : Jun 29, 2019, 8:43 AM IST

पुण्यातील कोंढाव्यात भिंत कोसळून १४ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू

पुणे - इमारतीची संरक्षक भिंत पत्र्याच्या खोल्यांवर कोसळून मोठा अपघात झाला. या अपघातात भिंतीच्या मलब्याखाली दबून १५ मजुरांचा मृत्यू झाला. ही घटना कोंढव्यातील सोमाजी पेट्रोल पंपाजवळ शुक्रवारी मध्यरात्रीनंतर घडली. हे मजूर बिहार राज्यातील असल्याची प्राथमिक माहिती सुत्रांनी दिली आहे. मात्र, अद्याप याला दुजोरा मिळालेला नाही. वाचा सविस्तर...

कोंढवा भिंत दुर्घटना : मृतांच्या नातेवाईकांना सर्वतोपरी मदत - जिल्हाधिकारी

पुणे- भिंत कोसळून मृत्युमुखी पडलेल्या बांधकाम मजुरांच्या नातेवाईकांना सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. या घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. या मृत्यूच्या तांडवामध्ये 15 जणांचा नाहक बळी गेला आहे. वाचा सविस्तर...

योगी सरकारचा मोठा निर्णय, अनुसूचित जातींच्या यादीत 17 ओबीसी जातींचा केला समावेश

लखनौ - राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील मागासवर्गीय जातींसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. योगी सरकारने शुक्रवारी अनुसूचित जातींच्या सूचीमध्ये 17 मागास जातींना (ओबीसी) समाविष्ट केले आहे. या जाती सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास आहेत, असे योगी सरकाराने म्हटले आहे. वाचा सविस्तर...

अकरावी प्रवेशासाठी आयसीएसई मंडळाच्या विद्यार्थ्यांचे ५ विषयाचेच गुण ग्राह्य धरणार - शिक्षणमंत्री

मुंबई- राज्यातील अकरावीच्या प्रवेशासाठी आयसीएसई विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेमध्ये ६ विषयांच्या गुणपत्रिकेवर एकूण ६ विषयांचे सरासरी गुण दर्शविण्यात आले आहेत. यापैकी पहिल्या ५ विषयांचे सरासरी गुण इयत्ता ११ वी प्रवेशाकरिता ग्राह्य धरण्यात येतील, असे शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे. यासाठी आदेशही काढण्यात आल्याचे सांगण्यात आले. वाचा सविस्तर...

पुनर्विकास प्रकल्पात भाडेकरूंना सलग ३ वर्षांचे घरभाडे मिळायला पाहिजे - मुख्यमंत्री

मुंबई- शहरात घर मालक, विकासक आणि भाडेकरूंच्या अनेक समस्या आहेत. विकसित होणाऱ्या इमारतींमधील भाडेकरूंना विकासकाने ३ वर्षांचे भाडे एकाच वेळी द्यावे, असा निर्णय घेणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. एमएमआरडीएच्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. वाचा सविस्तर...

बातमी, सर्वांच्या आधी

https://www.etvbharat.com/marathi/maharashtra

ABOUT THE AUTHOR

...view details