महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आज...आत्ता...शुक्रवारी २८ जून पर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडींवर एक नजर... - bulletin of ETV Bharat

जपानमधील ओसाका या ठिकाणी जी २० परिषद सुरू झाली आहे, महाराष्ट्रात मराठा आरक्षण मिळाल्याने जल्लोष केला जात आहे, तर दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीस, तावडे यांच्यासह न्यायाधीश मोरे यांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. तसेच बीडवरून नागपूरकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सने अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे. शिवाय किंग खानने विक्रम फडणीस दिग्दर्शित 'स्माईल प्लिज' सिनेमाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळ्यामध्ये हजेरी लावली होती.

महत्त्वाच्या घडामोडी

By

Published : Jun 28, 2019, 9:08 AM IST

Updated : Jun 28, 2019, 11:16 AM IST

जी २० परिषद : ट्रम्प आणि मोदींची भेट, 'या' प्रमुख मुद्द्यांवर चर्चा

ओसाका - जपानमधील ओसाका या ठिकाणी जी २० परिषद सुरू झाली आहे. या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. या भेटीमध्ये उभय देशांदम्यानचे संबंध, सुरक्षा, 5G, अमेरिका-इराण संबंध या चार प्रमुख मुद्द्यांवर चर्चा करण्यात येणार आहे. वाचा सविस्तर...

बीडवरून नागपूरकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सने घेतला पेट; चालकाच्या सतर्कतेमुळे प्रवाशी सुखरुप, सामान जळून खाक

बीड- बीड येथून नागपूरकडे जात असलेल्या भरधाव सागर ट्रॅव्हल्सला शुक्रवारी पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास आग लागली. औरंगाबाद नागपूर महामार्गावरील कीन्हीराजा हॉटेलजवळ ही घटना घडली असून यामध्ये गाडी जागीच जळून खाक झाली आहे. बसमधील प्रवाशांना चालकाने प्रसंगावधान राखत वेळेत बाहेर काढल्यामुळे कोणतीही जीवित हानी झालेली नाही. मात्र, प्रवाशांचे सामान आणि पैसे जळाल्याची माहिती आहे. वाचा सविस्तर...

घेतलं रे घेतलं... आरक्षण घेतलं... अशा घोषणा देत मराठा नेत्यांनी व्यक्त केला आनंद

मुंबई- मराठा समाजाला दिलेले आरक्षण न्यायालयात वैद्य ठरल्यानंतर अनेक ठिकाणी मराठा समाजाकडून जल्लोष केला जात आहे. मराठा मोर्चाच्या अनेक सभा ज्या दादरच्या शिवाजी मंदिरामध्ये झाल्या त्या शिवाजी मंदिराबाहेर मराठा नेत्यांनी लोकांना पेढे वाटून, फटाके फोडून आनंद साजरा केला. घेतलं रे घेतलं... आरक्षण घेतल... अशा घोषणा देऊन जल्लोष साजरा करण्यात आला. वाचा सविस्तर...

मुख्यमंत्री फडणवीस, तावडे यांच्यासह न्यायाधीश मोरे यांची सीबीआय चौकशी करा - अॅड सदावर्ते

मुंबई - उच्च न्यायालयाने आज मराठा आरक्षणबाबत निर्णय दिला. या निर्णयावर याचिकाकर्ते गुणरत्न सदावर्ते यांनी शंका उपस्थित केली आहे. त्यांनी न्यायाधीश रणजित मोरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावर संविधान पायदळी तुडवल्याचा गंभीर आरोप केला आहे. वाचा सविस्तर...

'किंग खान' शाहरुखच्या हस्ते 'स्माईल प्लिज' सिनेमाच ट्रेलर आणि म्युजिक लाँच

मुंबई - विक्रम फडणीस दिग्दर्शित 'स्माईल प्लिज' सिनेमाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. या सोहळ्याला बॉलिवूडचा 'किंग खान' शाहरुख हा खास पाहुणा म्हणून उपस्थित होता. वाचा सविस्तर...

बातमी, सर्वांच्या आधी
https://www.etvbharat.com/marathi/maharashtra

Last Updated : Jun 28, 2019, 11:16 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details