मुंबई - राज्यात सोमवारी (दि. १३ सप्टेंबर) २ हजार ७४० नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली आहे. गेल्या काही महिन्यातील ही सर्वात कमी रुग्णांची नोंद आहे. आज २७ रुग्णांचा मृत्यू झाला असून ३ हजार २३३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०५ टक्के इतका असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
राज्यात ४९ हजार ८८० सक्रिय रुग्ण
राज्यात सोमवारी दिवसभरात ३ हजार २३३ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६३ लाख ९ हजार २१ कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०५ टक्के एवढे झाले आहे. राज्यात ३ हजार ७४० नवीन रुग्णांचे निदान झाले असून २७ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण १ लाख ३८ हजार १६९ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ६० लाख ८८ हजार ११४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५ लाख ६१७ (११.५९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ९९ हजार १९२ व्यक्ती होम क्वारांटाईनमध्ये आहेत. राज्यात साध्य ४९ हजार ८८० सक्रिय रुग्ण आहेत.
रुग्णसंख्येत चढ-उतार
२६ ऑगस्टला ५ हजार १०८, ३० ऑगस्टला ३ हजार ७४१, ३१ ऑगस्टला ४ हजार १९६, १ सप्टेंबरला ४ हजार ४५६, २ सप्टेंबरला ४ हजार ३४२, ३ सप्टेंबरला ४ हजार ३१३, ४ सप्टेंबरला ४ हजार १३०, ५ सप्टेंबरला ४ हजार ५७, ६ सप्टेंबरला ३ हजार ६२६, ७ सप्टेंबरला ३ हजार ९८८, ८ सप्टेंबरला ४ हजार १७४, ९ सप्टेंबरला ४ हजार २१९, १० सप्टेंबरला ४ हजार १५४, ११ सप्टेंबरला ३ हजार ७५, १२ सप्टेंबरला ३ हजार ६२३, १३ सप्टेंबरला २ हजार ७४० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या महिनाभरात रुग्णसंख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे.
मृत्यूदर २.१२ टक्के
१९ जुलैला ६६, २४ जुलैला २२४, २६ जुलैला ५३, २७ जुलैला २५४, २८ जुलैला २८६, ३० जुलैला २३१, ३१ जुलैला २२५, ९ ऑगस्टला ६८, १२ ऑगस्टला २०८, २५ ऑगस्टला २१६, ३० ऑगस्टला ५२, ३१ ऑगस्टला १०४, १ सप्टेंबरला १८३, २ सप्टेंबरला ५५, ३ सप्टेंबरला ९२, ४ सप्टेंबरला ६४, ५ सप्टेंबरला ६७, ६ सप्टेंबरला ३७, ७ सप्टेंबरला ८६, ८ सप्टेंबरला ६५, ९ सप्टेंबरला ५५, १० सप्टेंबरला ४४, ११ सप्टेंबरला ३५, १२ सप्टेंबरला ४६, १३ सप्टेंबरला २७ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात २.१२ टक्के इतका मृत्यूदर नोंदवण्यात आला आहे.
या विभागात सर्वाधिक रुग्ण