मुंबई -राज्यात कोरोना महामारीच्या काळात २०२०- २१ मध्ये मद्य विक्रीचे प्रमाण घटले होते. मात्र, दुसऱ्या लाटेमध्ये मद्यविक्री मध्ये लाक्षणीय वाढ झाली. त्यानंतर राज्य सरकारने सर्व निर्बंध शिथिल केल्यानंतर जोरदार विक्री झाल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली आहे. गतवर्षी या विक्रीत विक्रमी व्या वाढ होऊन २ हजार ३५८ लाख लिटर ( Indian Made Foreign Liquor ) मद्याची विक्री झाल्याचेही राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ( State Excise Duty ) सांगण्यात आले.
गेल्या तीन वर्षातील सर्वाधिक मद्यविक्री -राज्यात गेल्या आर्थिक वर्षांत झालेली मद्यविक्री ही गेल्या तीन वर्षातील सर्वाधिक मद्यविक्री होती. मद्यविक्रीचे उद्दीष्ठ उत्पादन शुल्क विभागाला साध्य करता आलेले नाही. उत्पादन शुल्क विभागाने ठेवलेल्या उद्दिष्टापेक्षा पाच टक्के कमी महसूल जमा झाला आहे. १८ हजार कोटी रुपयांचे उद्दिष्ट महसूल विभागाने ठेवले होते. मात्र, त्यांना १७ हजार १७७ कोटी महसूल प्राप्त झाला आहे. २०१९-२० मध्ये राज्यात सुमारे दोन हजार १५७ लाख बल्क लिटर भारतीय बनावटीची विदेशी दारू ( Indian Made Foreign Liquor ) विक्री करण्यात आली. त्यानंतर २०२०-२०२१ मध्ये हा आकडा घसरून १ हजार ९९९ लाख बल्क लिटर इतका झाला होता. त्यानंतर पुन्हा एकदा गतवर्षी या विक्रीत विक्रमी वाढ होऊन २ हजार ३५८ लाख लिटर भारतीय बनावटीच्या विदेश मद्याची विक्री झाली.