महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दिलासादायक..! रुग्ण बरे होण्याचा दर 93 टक्क्यांवर, 21 हजार 273 नवे रुग्ण

राज्यात आज (दि. 27 मे) 34 हजार 370 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून रुग्ण बरे होण्याचा दर 93.02 टक्क्यांवर पोहोचला आहे.

कोरोना
कोरोना

By

Published : May 27, 2021, 10:47 PM IST

Updated : May 27, 2021, 10:52 PM IST

मुंबई -महाराष्ट्रात आज (दि. 27 मे) 21 हजार 273 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून 425 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर आज 34 हजार 370 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.राज्यातील एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडा 52 लाख 76 हजार 203 इतका झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे रुग्ण बरे होण्याचा दर 93.02 टक्क्यांवर पोहोचला आहे.

3 लाख 1 हजार 41 सक्रिय रुग्ण

राज्यात सध्या तीन लाख एक हजार 41 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 56 लाख 72 हजार 180 वर पोहोचला आहे. आतापर्यंत मृतांचा आकडा 92 हजार 225 इतका झाला आहे.

हेही वाचा -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांचा 'त्या' नुकसानग्रस्त शिक्षिकेला मदतीचा हात

Last Updated : May 27, 2021, 10:52 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details