महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

corona update : ३ हजार ३९१ नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ, ८० मृत्यू - कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला

राज्यात शनिवारी (दि. १८ सप्टेंबर) ३ हजार ३९१ रुग्ण आढळून आले आहेत तर ८० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज ३ हजार ८४१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ६५ लाख १८ हजार ५०२ कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. त्यापैकी ६३ लाख २८ हजार ५६१ कोरोनामुक्त झाले आहेत तर १ लाख ३८ हजार ४६९ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.

v
v

By

Published : Sep 18, 2021, 8:54 PM IST

मुंबई - राज्यात शनिवारी (दि. १८ सप्टेंबर) ३ हजार ३९१ रुग्ण आढळून आले आहेत तर ८० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज ३ हजार ८४१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ६५ लाख १८ हजार ५०२ कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. त्यापैकी ६३ लाख २८ हजार ५६१ कोरोनामुक्त झाले आहेत तर १ लाख ३८ हजार ४६९ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

राज्यात ४७ हजार ९१९ सक्रिय रुग्ण

राज्यात आज दिवसभरात ३ हजार ८४१ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६३ लाख २८ हजार ५६१ कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०९ टक्के एवढे झाले आहे. राज्यात ३ हजार ३९१ नवीन रुग्णांचे निदान झाले असून ८० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण १ लाख ३८ हजार ४६९ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ६८ लाख ७४ हजार ४९१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५ लाख १८ हजार ५०२ (११.४६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ८३ हजार ४४५ व्यक्ती होम क्वारांटाईनमध्ये आहेत. राज्यात साध्य ४७ हजार ९१९ सक्रिय रुग्ण आहेत.

रुग्णसंख्येत चढउतार

२६ ऑगस्टला ५ हजार १०८, ३० ऑगस्टला ३ हजार ७४१, ३१ ऑगस्टला ४ हजार १९६, १ सप्टेंबरला ४ हजार ४५६, २ सप्टेंबरला ४ हजार ३४२, ३ सप्टेंबरला ४ हजार ३१३, ४ सप्टेंबरला ४ हजार १३०, ५ सप्टेंबरला ४ हजार ५७, ६ सप्टेंबरला ३ हजार ६२६, ७ सप्टेंबरला ३ हजार ९८८, ८ सप्टेंबरला ४ हजार १७४, ९ सप्टेंबरला ४ हजार २१९, १० सप्टेंबरला ४ हजार १५४, ११ सप्टेंबरला ३ हजार ७५, १२ सप्टेंबरला ३ हजार ६२३, १३ सप्टेंबरला २ हजार ७४०, १४ सप्टेंबरला ३ हजार ५३०, १५ सप्टेंबरला ३ हजार ७८३, १६ नोव्हेंबरला ३ हजार ५९५, १७ सप्टेंबरला ३ हजार ५८६, १८ सप्टेंबरला ३ हजार ३९१ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या महिनाभरात रुग्णसंख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे.

मृत्यूदर २.१२ टक्के

१९ जुलैला ६६, २४ जुलैला २२४, २६ जुलैला ५३, २७ जुलैला २५४, २८ जुलैला २८६, ३० जुलैला २३१, ३१ जुलैला २२५, ९ ऑगस्टला ६८, १२ ऑगस्टला २०८, २५ ऑगस्टला २१६, ३० ऑगस्टला ५२, ३१ ऑगस्टला १०४, १ सप्टेंबरला १८३, २ सप्टेंबरला ५५, ३ सप्टेंबरला ९२, ४ सप्टेंबरला ६४, ५ सप्टेंबरला ६७, ६ सप्टेंबरला ३७, ७ सप्टेंबरला ८६, ८ सप्टेंबरला ६५, ९ सप्टेंबरला ५५, १० सप्टेंबरला ४४, ११ सप्टेंबरला ३५, १२ सप्टेंबरला ४६, १३ सप्टेंबरला २७, १४ सप्टेंबआ ५२, १५ सप्टेंबरला ५६, १६ नोव्हेंबरला ४५, १७ सप्टेंबरला ६७, १८ सप्टेंबरला ८० मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात २.१२ टक्के इतका मृत्यूदर नोंदवण्यात आला आहे.

या विभागात सर्वाधिक रुग्ण

मुंबई - ४७८

अहमदनगर - ६६८

पुणे - ४३१

पुणे पालिका - १८६

पिपरी चिंचवड पालिका - १११

सोलापूर - ३१५

सातारा - ३००

सांगली - ९०

हेही वाचा -विशेष बातमी : 'अँटीबॉडीज', लसीकरणानंतरही होऊ शकतो कोरोना - सुरेश काकाणी

ABOUT THE AUTHOR

...view details