मुंबई - गुरुवारी (दि. ७ जाने.) राज्यात ३ हजार ७२९ नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली आहे. यामुळे कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा १९ लाख ५८ हजार २८२ वर पोहोचला आहे.
मृतांचा आकडा ४९ हजार ८९७ वर
राज्यात आज (गुरुवारी) ७२ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण ४९ हजार ८९७ रुग्णांचा मृत्यू आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५५ टक्के एवढा आहे.
५१ हजार १११ सक्रिय रुग्ण
राज्यात आज एकूण ५१ हजार १११ सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.७८ टक्के
राज्यात आज (७ जाने.) ३ हजार ३५० रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आजपर्यंत एकूण १८ लाख ५६ हजार १०९ जण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.७८ टक्के एवढे झाले आहे.
आजपर्यंत १४.८४ नमुने पॉझिटिव्ह
आजपर्यंत १ कोटी ३१ लाख ९९ हजार २०१ जणांच्या तपासण्यात करण्यात आलेल्या आहेत. प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९ लाख ५८ हजार २८२ नमुने म्हणजेच १४.८४ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात २ लाख ७० हजार २१७ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत.
हेही वाचा -खुशखबर! 11 जानेवारीपासून फास्टटॅगमध्ये 5 टक्के कॅशबॅक
हेही वाचा -राज्यातील 30 जिल्हे, 25 महानगरपालिका क्षेत्रात उद्या कोरोना लसीचे ड्राय रन