महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्यात ३ हजार ८३७ नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ, ८० रुग्णांचा मृत्यू - महाराष्ट्र कोरोना आकडेवारी

राज्यात सोमवारी (दि. ३० नोव्हेंबर) ३ हजार ८३७ नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून एकूण आकडा १८ लाख २३ हजार ८९६ वर पोहोचला आहे.

कोरोना अपडेट
कोरोना अपडेट

By

Published : Nov 30, 2020, 7:41 PM IST

मुंबई - राज्यात सोमवारी (दि. ३० नोव्हेंबर) ३ हजार ८३७ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा १८ लाख २३ हजार ८९६ वर पोहोचला आहे. राज्यात सोमवारी ८० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण ४७ हजार १५१ रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.५९ टक्के एवढा आहे. राज्यात सध्या ९० हजार ५५७ सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

९० हजार ५५७ सक्रिय रुग्ण

राज्यात सोमवारी (दि. ३० नोव्हेंबर) ४ हजार १९६ रुग्ण बरे होऊन घरी, गेले असून आजपर्यंत एकूण १६ लाख ८५ हजार १२२ कोरोना बाधित बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.३९ टक्के एवढे झाले आहे. राज्यात सोमवारी ८० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ८ लाख ५६ हजार ३८४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८ लाख २३ हजार ८९६ नमुने म्हणजेच १६.८ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५ लाख ३५ हजार ५३० व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये तर ६ हजार ३५४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

कधी किती रुग्ण आढळून आले

राज्यात जून दरम्यान दिवसाला सरासरी ५ हजार ४०० रुग्ण आढळून येत होते. टाळेबंदीमध्ये शिथिलता दिल्यावर रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात ही रुग्णसंख्या १० हजार ५०० वर गेली होती. सप्टेंबरच्या सुरुवातीला रुग्णसंख्या २० हजार ४०० वर गेली होती. सप्टेंबर महिना संपताना रुग्णसंख्या २४ हजार ८०० वर गेली होती. मात्र, ही रुग्णसंख्या गेल्या काही दिवसात कमी होत आहे. राज्यात १२ ऑक्टोबरला ७ हजार ८९ रुग्ण, १३ ऑक्टोबरला ८ हजार ५२२ रुग्ण आढळून आले होते. १९ ऑक्टोबरला ५ हजार ९८४ रुग्णांची, २६ ऑक्टोबरला ३ हजार ६४५, ७ नोव्हेंबरला ३ हजार ९५९, १० नोव्हेंबरला ३ हजार ७९१, १५ नोव्हेंबरला २ हजार ५४४, १६ नोव्हेंबरला २ हजार ५३५, १७ नोव्हेंबरला २ हजार ८४०, २० नोव्हेंबरला ५ हजार ६४०, तर २१ नोव्हेंबरला ५ हजार ७६० रुग्ण आढळून आले आहेत.

हेही वाचा -'शिवसेनाला हिरवा रंग गोड वाटतोय, औवेसीला लाजवेल इतका सेक्युलरपणा शिवसेनेत'

ABOUT THE AUTHOR

...view details