महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महाराष्ट्र कोरोना अपडेट : राज्यात १२,२५८ नवीन रुग्ण, ३७० रुग्णांचा मृत्यू - महाराष्ट्र कोरोना स्थिती

आज राज्यात १७ हजार १४१ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आजपर्यंत एकूण ११ लाख ७९ हजार ७२६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८०.४८ टक्के एवढे झाले आहे.

महाराष्ट्र कोरोना अपडेट
महाराष्ट्र कोरोना अपडेट

By

Published : Oct 6, 2020, 10:25 PM IST

मुंबई - राज्यात आज कोरोना विषाणूची लागण झालेल्या १२ हजार २५८ नवीन रुग्णांचे निदान झाले. तर ३७० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यभरातून आज १७ हजार १४१ रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८०.४८ टक्के एवढे झाल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

आज मंगळवारी राज्यात १२ हजार २५८ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा १४ लाख ६५ हजार ९११ वर पोहचला आहे. राज्यात आज ३७० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून राज्यभरातील मृतांचा एकूण आकडा ३८ हजार ७१७ वर पोहचला आहे. राज्यातील मृत्यू दर २.६४ टक्के इतका आहे. आज राज्यात १७ हजार १४१ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आजपर्यंत एकूण ११ लाख ७९ हजार ७२६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८०.४८ टक्के एवढे झाले आहे.

हेही वाचा -Mumbai Corona Update : दिवसभरात 1,625 नव्या रुग्णांची नोंद; 47 जणांचा मृत्यू, 1,966 रुग्णांची कोरोनावर मात

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७२ लाख ४१ हजार ३७६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १४ लाख ६५ हजार ९११ म्हणजेच २०.२४ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २२ लाख ३८ हजार ३५१ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर २५ हजार ८२८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात २ लाख ४७ हजार ०२३ अ‌ॅक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.

हेही वाचा -'स्वत:चे अस्तित्त्व दाखवण्यासाठीच विरोध, आम्ही त्याकडे लक्ष देत नाही'

ABOUT THE AUTHOR

...view details