महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईत 1 हजार 325 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ, 38 रुग्णांचा मृत्यू - मुंबई कोरोनाग्रस्त बातमी

मुंबईत आज 1 हजार 325 नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून 38 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

मुंबई महापालिका
मुंबई महापालिका

By

Published : Oct 13, 2020, 10:43 PM IST

मुंबई - आज (दि. 13 ऑक्टोबर) मुंबईत कोरोनाच्या 1 हजार 325 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 38 रुग्णांचा मृत्यू झाला असून 2 हजार 354 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

मुंबईत आज (मंगळवारी) कोरोनाचे 1 हजार 325 नवे रुग्ण आढळून आले असून 38 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 35 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 28 पुरुष तर 10 महिला रुग्ण आहेत. मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 लाख 32 हजार 395 वर पोहोचला आहे. तर, मृतांचा आकडा 9 हजार 504 वर पोहोचला आहे. मुंबईमधून आज 2 हजार 354 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईत डिस्चार्ज देण्यात आलेल्यांचा आकडा 1 लाख 98 हजार 127 वर गेला आहे. सध्या मुंबईत 21 हजार 841 सक्रिय रुग्ण आहेत.

मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85 टक्क्यांवर पोहचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 71 दिवस तर सरासरी दर 0.98 टक्के आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या 648 चाळी आणि झोपडपट्टी कंटेन्मेंट झोन (प्रतिबंधित क्षेत्र) घोषित करून सील करण्यात आल्या आहेत. तसेच 9 हजार 963 इमारती व इमारतीच्या विंग, काही मजले सील करण्यात आले आहेत. तर, कोरोनाचे निदान करण्यासाठी 12 लाख 80 हजार 220 इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.

होही वाचा -एसआरए आणि पीएमएवाय प्रकल्पासाठी केंद्राने काही सवलती द्याव्या, मंत्री आव्हाड यांची मागणी

ABOUT THE AUTHOR

...view details