मुंबई- राज्यात लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू आहे. तिसऱ्या टप्प्याच्या तिसऱ्या दिवशी 51 हजार 240 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. 60 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या 24 हजार 186 लाभार्थ्यांना लसीचा पहिला डोस देण्यात आला. तर 45 ते 60 वयोगटातील गंभीर आजार असणाऱ्या 3 हजार 656 लाभार्थ्यांना लसीचा पहिला डोस देण्यात आला.
राज्यात लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू आहे आज (दि. 3) 51 हजार 240 लाभार्थ्यांना लस देण्यात आली त्यात 41 हजार 225 लाभार्थ्यांना पहिला डोस तर 10 हजार 15 लाभार्थ्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला. हेल्थ वर्कर आणि फ्रन्टलाइन वर्कर यांचेही लसीकरण सुरू आहे यांपैकी आज 7 हजार 410 हेल्थ वर्कर यांना तर 5 हजार 973 फ्रन्टलाइन वर्कर यांना पहिला डोस देण्यात आला. तर 10 हजार 15 फ्रन्टलाइन वर्कर यांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला. राज्यात आज 50 हजार 263 लाभार्थ्यांना कोव्हिशिल्ड ही लस देण्यात आली. तर 977 लाभार्थ्यांना कोव्हक्सिनने लसीकरण करण्यात आले. राज्यात आत्तापर्यंत 13 लाख 72 हजार 886 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले.
आत्तापर्यंत कोणत्या जिल्ह्यात किती लाभार्थ्यांचे लसीकरण?