मुंबई -राज्यात आज नव्या 62 हजार 194 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण कोरोना रुग्णांचा संख्या 49 लाख 42 हजार 736 एवढी झाली आहे. तर 853 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच आज दिवसभरात 63 हजार 842 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यात एकूण सक्रिय रुग्णांचा संख्या 6 लाख 39 हजार 75 इतकी झाली आहे.
कोणत्या भागात सर्वाधिक नव्या रुग्णांची नोंद -
मुंबई महानगरपालिका 3028 रुग्ण, ठाणे 822, ठाणे मनपा 617, नवी मुंबई 288, कल्याण डोंबिवली 606, मीराभाईंदर 286, पालघर 612, वसई विरार मनपा 937, रायगड 948, पनवेल मनपा 292, नाशिक 6239
नाशिक मनपा 2318, अहमदनगर 3081, अहमदनगर मनपा 612, धुळे 160, जळगाव 841, नंदुरबार 215, पुणे 4153, पुणे मनपा 3164, पिंपरी चिंचवड 2414, सोलापूर 2126, सोलापूर मनपा 336, सातारा 2260, कोल्हापूर 1142, कोल्हापूर मनपा 345, सांगली 1760, सिंधुदुर्ग 335, रत्नागिरी 755, औरंगाबाद 594, औरंगाबाद मनपा 357, जालना 895, हिंगोली 256, परभणी 561, परभणी मनपा 146, लातूर 878, लातूर मनपा 280, उस्मानाबाद 758, बीड 1,435, नांदेड मनपा 166, नांदेड 474, अकोला 286, अमरावती मनपा 140, अमरावती 934, यवतमाळ 864, बुलढााणा 2054, वाशिम 443, नागपूर 2032, नागपूर मनपा 2868, वर्धा 912, भंडारा 533, गोंदिया 381, चंद्रपूर 945, चंद्रपूर मनपा 454 तर गडचिरोलीत 585 रुग्णांची नोंद झाली आहे.
हेही वाचा - धक्कादायक..! कोरोना आजाराच्या दुसऱ्या लाटेत म्युकरमायकोसिस आजाराचा प्रादुर्भाव