राज्यात 24 तासांत 68 हजार 537 रुग्ण कोरोनामुक्त, 771 मृत्यू - Maharashtra corona news
राज्यात मागील 24 तासांत 66 हजार 159 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून 771 जणांचा मृत्यू झाला आहे. मागील 24 तासांत 68 हजार 537 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
महाराष्ट्र कोरोना
By
Published : Apr 29, 2021, 9:12 PM IST
मुंबई - राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जरी वाढत असले तरी नव्याने रुग्ण वाढीचे प्रमाण जैसे थेच आहे. आजही (दि. 29 एप्रिल) राज्यात 66 हजार 159 रुग्णांची नोंद झाली आहे तर आज उपचारादरम्यान 771 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात मृत्यूदर 1.5 टक्के इतका आहे. तसेच राज्यात 24 तासांत 68 हजार 537 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तरी मृतांच्या संख्येत होणारी वाढ प्रशासनाच्या चिंतेत वाढ घालणारी आहे.
मागील पाच दिवसातील मृतांची आकडेवारी
दिनांक
मृत्यू
28 एप्रिल 2021
985
27 एप्रिल 2021
895
26 एप्रिल 2021
524
25 एप्रिल 2021
832
24 एप्रिल 2021
676
राज्यातील कोरोनाची स्थिती
राज्यात 68 हजार 537 रुग्ण 24 तासांत कोरोना मुक्त झाले आहेत.
राज्यात आतापर्यंत 37लाख 99 हजार 266 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
राज्यात नव्या 66 हजार 159 रुग्णांची नोंद झाली आहे.
राज्यात 24 तासांत 771 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूदर 1.5 टक्के एवढा आहे.
राज्यात एकूण 45 लाख 39 हजार 553 रुग्णांची नोंद झाली आहे. 3
राज्यात एकूण सक्रिय रुग्ण 6 लाख 70 हजार 301 इतकी झाली आहे.
राज्यात 'या' भागात सर्वाधिक नव्या रुग्णांची नोंद
मुंबई महानगरपालिका- 4174 ठाणे- 1160 ठाणे महानगरपालिका- 842 नवी मुंबई-559 कल्याण डोंबिवली- 864 मीराभाईंदर-461 पालघर-650 वसई विरार महानगरपालिका-804 रायगड-1063 पनवेल महानगरपालिका-604 नाशिक-1754 नाशिक महानगरपालिका- 2663 अहमदनगर-2117 अहमदनगर महानगरपालिका-703 धुळे- 199 जळगाव- 927 नंदुरबार-1161 पुणे- 4332 पुणे महानगरपालिका- 5097 पिंपरी चिंचवड- 2457 सोलापूर- 2089 सोलापूर महानगरपालिका-320 सातारा - 2175 कोल्हापुर-638 कोल्हापूर महानगरपालिका-204 सांगली- 1253 सिंधुदुर्ग-141 रत्नागिरी-918 औरंगाबाद-913 औरंगाबाद महानगरपालिका-508 जालना-691 हिंगोली-152 परभणी -991 परभणी महानगरपालिका-322 लातूर 828 लातूर महानगरपालिका-294 उस्मानाबाद-922 बीड -1,511 नांदेड महानगरपालिका-323 नांदेड-498 अकोला महानगरपालिका-319 अमरावती महानगरपालिका-181 अमरावती 712 यवतमाळ-1487 बुलढााणा- 1131 वाशिम - 319 नागपूर- 2967 नागपूर महानगरपालिका-4808 वर्धा-1435 भंडारा-1106 गोंदिया-566 चंद्रपुर-958 चंद्रपूर महानगरपालिका-220 गडचिरोली-609