मुंबई -राज्यात मागील 24 तासात 63 हजार 294 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहिती नुसार राज्यात 349 रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर 1.7 टक्क्यांवर पोहोचला आहे. कोरोनाची ही लाट पहिल्या लाटेपेक्षा भयंकर असल्याचे आकडे सांगतात.
राज्यातील कोरोनाची स्थिती
राज्यात 34 हजार 8 रुग्ण 24 तासांत कोरोना मुक्तझाले आहेत. राज्यात आतापर्यंत 27 लाख 82 हजार 161रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात एकूण 34 लाख 7 हजार 245 रुग्णांची नोंद झाली असून सध्या राज्यात एकूण 5 लाख 65 हजार 587 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत.
राज्यात कोणत्या भागात सर्वाधिक नव्या रुग्णांची नोंद
मुंबई महानगरपालिका - 9 हजार 986
ठाणे - 1 हजार 87
ठाणे महापालिका - 1 हजार 783
नवी मुंबई - 1 हजार 306
कल्याण डोंबिवली - 2 हजार 552
उल्हासनगर - 232
मीराभाईंदर - 456
पालघर - 445
वसई विरार महापालिका - 666
रायगड - 755
पनवेल महापालिका - 596
नाशिक - 1 हजार 724
नाशिक महापालिका - 1 हजार 608
अहमदनगर - 1 हजार 722
अहमदनगर महापालिका - 598
धुळे - 299
जळगाव - 1 हजार 258
जळगाव महापालिका - 438
नंदुरबार - 479
पुणे- 2 हजार 690
पुणे महापालिका - 6 हजार 923
पिंपरी चिंचवड - 2 हजार 391
सोलापूर - 846