मुंबई- राज्यात आज (22 ऑक्टोबर) 7 हजार 539 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून एकूण बाधितांचा आकडा 16 लाख 25 हजार 197वर पोहोचला आहे. तसेच आज 16 हजार 177 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून बरे झालेल्यांची एकूण संख्या 14 लाख 31 हजार 856वर पोहोचला आहे.
सध्या 1 लाख 50 हजार 11 सक्रिय रुग्णांवर राज्यातील विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहे. आज (गुरुवार) राज्यात 198 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून आतापर्यंत 42 हजर 831 बाधित रुग्णांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत.