महाराष्ट्र

maharashtra

मुंबईत १४४२ रुग्ण गंभीर अवस्थेत; १४५४ व्हेंटिलेटरवर तर २८१४ आयसीयूमध्ये

By

Published : Apr 30, 2021, 4:18 PM IST

गेल्या चार दिवसांत नव्याने आढळून आलेल्या रुग्णांच्या संख्येत घट आली आहे. मात्र, १ हजार ४४२ रुग्ण गंभीर अवस्थेत असून १ हजार ४५४ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. तसेच २ हजार ८१४ रुग्ण आयसीयूमध्ये आहेत.

mumbai latest news
मुंबईत १४४२ रुग्ण गंभीर अवस्थेत; १४५४ व्हेंटिलेटरवर तर २८१४ आयसीयूमध्ये

मुंबई -वर्षभरापासून कोरोनाचा प्रसार सुरु आहे. परंतु गेल्या दोन महिन्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढला आहे. गेल्या चार दिवसांत नव्याने आढळून आलेल्या रुग्णांच्या संख्येत घट आली आहे. मात्र, १ हजार ४४२ रुग्ण गंभीर अवस्थेत असून १ हजार ४५४ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. तसेच २ हजार ८१४ रुग्ण आयसीयूमध्ये आहेत. तर ९ हजार ६६७ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

मुंबईत कोरोना वाढला -

मुंबईत गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. तेंव्हापासून महापालिकेचा आरोग्य विभाग कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रयत्न करत आहे. या वर्षी फेब्रुवारी महिन्यात कोरोनाचा प्रसार काही प्रमाणात कमी झाला. मात्र, गर्दीवर नियंत्रण न राहिल्याने मुंबईत गेल्या दोन महिन्यात पुन्हा कोरोनाचा झपाट्याने प्रसार झाला आहे. गेल्या महिनाभरात दिवसाला ७ ते ११ हजार रुग्ण आढळून आले आहेत. सध्या मुंबईमध्ये ४ हजाराच्या घरात रुग्ण आढळून येत आहेत. मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा ६ लाख ४४ हजार ६९९ वर पोहचला आहे. मृतांचा आकडा १३ हजार ७२ वर पोहचला आहे. रुग्ण बरे होण्याची संख्या ५ लाख ६६ हजार ५१ वर पोहचली आहे. मुंबईत सध्या ६४ हजार १८ सक्रिय रुग्ण आहेत.

१४४२ रुग्णा गंभीर अवस्थेत -

मुंबईमध्ये २८ एप्रिलच्या आकडेवारीप्रमाणे ६५ हजार ५८९ सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी ४७ हजार ६३२ रुग्णांना लक्षणे असून लक्षणे नेसलेले १६ हजार ५१५ रुग्ण आहेत. तर १ हजार ४४२ रुग्ण गंभीर अवस्थेत आहेत. २९ एप्रिलच्या आकडेवारीनुसार महापालिका, सरकारी, खासगी आणि कोविड सेंटरमध्ये ३० हजार ६० बेड्स आहेत. त्यापैकी १९ हजार ६५२ बेड्सवर रुग्ण आहेत, तर १० हजार ४०८ खाटा रिक्त आहेत. ऑक्सिजनचे ११ हजार १४७ बेड्स असून त्यापैकी ९ हजार ६६७ बेड्सवर रुग्ण आहेत, तर १ हजार ४८० खाटा रिक्त आहेत. आयसीयूच्या २ हजार ८८७ खाटा आहेत. त्यापैकी २ हजर ८१४ खाटांवर रुग्ण आहेत, तर ७३ खाटा रिक्त आहेत. १ हजार ४७४ व्हेंटिलेटर असून त्यापैकी १ हजर ४५४ व्हेंटिलेटरवर रुग्ण आहेत, तर २० व्हेंटिलेटर खाटा रिक्त आहेत.

२.०३ टक्के मृत्यू दर -

२९ एप्रिलच्या आकडेवारीनुसार मुंबईत गेल्या वर्षभरात कोरोनाची लागण झाललेल्या रुग्णांचा आकडा ६ लाख ४४ हजार ६९९ वर पोहचला आहे. मृतांचा आकडा १३ हजार ७२ वर पोहचला आहे. त्यामधील ११ हजार २७० रुग्ण हे ५० वर्षावरील आहेत. मुंबईमध्ये सध्या २.०३ टक्के मृत्यू दर आहे.

मृत्यू दर कमी होत आहे -

मुंबईत लॉकडाऊन आहे. त्यामुळे संशयित कमी आढळून येत आहेत. त्यामुळे चाचण्या कमी केल्या जात आहेत. मुंबईमधील रुग्णसंख्या, पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण कमी होत आहे. रुग्णाच्या घरी जाऊन त्यांना खरंच बेड्सची गरज आहे का, याची पाहणी केली जात आहे. रुग्णांची वर्गवारी करून त्यांच्या गरजेनुसार खाटा उपलब्ध केल्या जात आहे. त्यामुळे बेड्स कमी लागत आहेत. नवीन १०० आयसीयू बनवले जात आहेत. रुग्णसंख्या वाढत असली तरी मृत्यू दर कमी होत आहे. आमचे मिशन सेव्ह लाईव्हज काम करत आहे. मृत्यूंच्या कारणांचा पुन्हा आढावा घेतला जाणार आहे. जे मृत्यू होत आहे त्याच्या कारणांचा शोध घेतला जाणार आहे, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

हेही वाचा - कोरोनाची तिसरी लाट गृहीत धरूनच काटेकोर नियोजन करा; मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

ABOUT THE AUTHOR

...view details