मुंबई - रविवारी (दि. 30 मे) 1 हजार 66 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली आहे. आज 22 रुग्णांचा मृत्यू झाला असून 1 हजार 327 जण कोरोनामुक्त झाला आहेत. एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 7 लाख 5 हजार 575 वर पोहोचला आहे. मृतांचा आकडा 14 हजार 855 वर पोहोचला आहे. आतापर्यंत 6 लाख 61 हजार 226 कोरोनामुक्त झाले आहे.
27 हजार 322 सक्रिय रुग्ण
मुंबईत सध्या 27 हजार 322 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 414 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 38 चाळी आणि झोपडपट्ट्या प्रतिबंधित क्षेत्र (कंटेंनमेंट झोन) म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर 160 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आज 24 हजार 548 तर आतापर्यंत एकूण 62 लाख 53 हजार 878 चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.