मुंबई - मुंबईत 300 ते 400 रुग्ण आढळून येत होते. मात्र, फेब्रुवारी महिन्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्यास सुरुवात झाली. गेल्या आठवड्यात चार ते पाच दिवस मुंबईत एक हजाराच्यावर रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर गेले दोन दिवस 855 व 849 इतके रुग्ण आढळून आले. आज (दि. 4) 1 हजार 103 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 5 जणांचा मृत्यू झाला आहे.
कोरोना रुग्णांची आकडेवारी
मुंबईत आज 1 हजार 103 रुग्ण आढळून आल्याने कोरोनाग्रस्तांचा आकडा 3 लाख 29 हजार 843 वर पोहचला आहे. आज 5 जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 11 हजार 487 वर पोहोचला आहे. 654 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 3 लाख 7 हजार 27 वर पोहोचली आहे. मुंबईत सध्या 10 हजार 452 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 238 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 14 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेंनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर 185 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत 33 लाख 53 हजार 124 चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
हे विभाग हॉटस्पॉट