मुंबई- मुंबईत मार्च पासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. कोरोनाचा प्रसार काही प्रमाणात आटोक्यात आला असताना ऑगस्ट महिन्यात आलेल्या धार्मिक सणानंतर सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून रुग्णांचा संख्येत पुन्हा वाढ होऊ लागली होती. मात्र गेल्या काही दिवसात पुन्हा रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. आज मुंबईत कोरोनाच्या नव्या 1222 रुग्णांची नोंद झाली असून 46 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या पंधरा दिवसात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 69 वरून 126 दिवस इतका वाढला असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
मुंबईत आज (रविवारी) कोरोनाचे 1222 नवे रुग्ण आढळून आले असून 46 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 33 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 31 पुरुष तर 15 महिला रुग्ण आहेत. मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 लाख 51 हजार 283 वर पोहचला आहे. तर, मृतांचा आकडा 10 हजार 062 वर पोहचला आहे. मुंबईमधून आज 1013 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईत डिस्चार्ज देण्यात आलेल्यांचा आकडा 2 लाख 20 हजार 165 वर गेला आहे. सध्या मुंबईत 19 हजार 721 सक्रिय रुग्ण आहेत.