मुंबई- शहरात कोरोनाचे नवे 1 हजार 298 रुग्ण आढळून आले आहेत. तर, 67 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे, मुंबईतील आतापर्यंतचा कोरोनाग्रस्तांचा आकडा 62 हजार 799 वर पोहोचला आहे. तर, मृतांचा आकडा 3309 वर पोहोचला आहे. मुंबईमधून आतापार्यंत 31 हजार 856 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याने सध्या 27 हजार 634 रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
मुंबईत 1 हजार 298 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, 67 जणांचा मृत्यू - मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या
जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचे मुंबईत गुरुवारी 1298 नवे रुग्ण आढळून आले. तर, 67 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांपैकी 49 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. यात 46 पुरुष आणि 21 महिला रुग्ण होत्या.
मुंबईत 1 हजार 298 नव्या कोरोना रुग्णांची नोंद
जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचे मुंबईत गुरुवारी 1298 नवे रुग्ण आढळून आले. तर, 67 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांपैकी 49 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. यात 46 पुरुष आणि 21 महिला रुग्ण होत्या. मृतांमध्ये 7 जणांचे वय 40 वर्षांखाली होते, 32 जणांचे वय 60 वर्षांवर तर 28 जणांचे वय 40 ते 60 वर्षादरम्यान होते. मुंबईमधून आज 518 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.