मुंबई - मुंबईत मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. हा प्रादुर्भाव कमी होत असताना 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. सोमवारी (दि. 22) 11 हजार 300 लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. या उद्दीष्टापेक्षा जास्त म्हणजेच 10 हजार 556 जणांना लसीकरण करण्यात आले. आतापर्यंत 1 लाख 79 हजार 825 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात 1 लाख 72 हजार 6 आरोग्य कर्मचारी तर 7 हजार 819 फ्रंटलाईन वर्करचा समावेश आहे.
लसीकरणाची आकडेवारी
देशभरात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. कोविन ऍपमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे स्थगित करण्यात आली होती. 19 जानेवारीपासून पुन्हा लसीकरणाला सुरुवात झाली. मुंबईत सोमवारी (दि. 22) 30 लसीकरण केंद्रांवर 113 बूथवर 4 हजार आरोग्य कर्मचारी तर 7 हजार 300 फ्रंट लाईन वर्कर, अशा एकूण 11 हजार 300 जणांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. उद्दीष्टांपेक्षा 93 टक्के म्हणजेच 10 हजार 556 लसीकरण करण्यात आले. त्यातील 7 हजार 792 लाभार्थ्यांना पहिला तर 2 हजार 764 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. लसीकरणाचा 7 जणांवर सौम्य दुष्परिणाम झाला. आतापर्यंत 1 लाख 72 हजार 6 लाभार्थ्यांना पहिला तर 7 हजार 819 लाभार्थ्यांना दुसरा, अशा एकूण 1 लाख 79 हजार 825 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.