मुंबई -राज्यात मंगळवारी (दि. 15 जून) नव्या 9 हजार 350 रुग्णांची नोंद झाली असून 388 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सोमवारच्या तुलनेत रुग्णांची संख्या मंगळवारी 1 हजार 200 ने वाढली आहे. राज्यात एकूण 59 लाख 24 हजार 773 इतक्या रुग्णांची नोंद झाली आहे.
राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा
राज्यात नव्या 9 हजार 350 रुग्णांची नोंद
राज्यात एकूण 59 लाख 24 हजार, 773 इतक्या रुग्णांची नोंद
24 तासांत 15 हजार 176 रुग्ण कोरोनामुक्त
आतापर्यंत 56 लाख 69 हजार 179 रुग्ण कोरोनामुक्त
24 तासांत 388 रुग्णांचा मृत्यू
राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या 1लाख 38 हजार 361
24 तासांत कोणत्या जिल्हृयात किती नव्या रुग्णांची नोंद
मुंबई महानगरपालिका- 572
कल्याण डोंबिवली महापालिका-572
पालघर - 290
रायगड- 494
नाशिक-146
नाशिक मनपा-107