मुंबई -विमानतळाच्या धर्तीवर मुंबई महानगरातील १९ रेल्वे स्थानके बनवण्याची ९४७ कोटी रुपयांची योजना आखली आहे. त्यांचे काम कागदोपत्री पूर्ण झाले होते. या स्थानकातील विकास कामाला डिसेंबर, २०२१ पासून सुरुवात हाेणार हाेती.पण, हा प्रकल्प रखडला आहे. आता नुकताच १९ रेल्वे स्थानकांचा पुर्नविकासाठी निविदा काढली आहे. त्यामुळे आता या स्थानकांचा विकास कामाला गती मिळणार असल्याचा, विश्वास मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून ( Mumbai Railway Development Corporation ) करण्यात आलेला आहे.
काय आहे योजना -मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून पश्चिम व मध्य रेल्वेवरील १९ उपनगर रेल्वे स्थानकाचा ( Suburban Railway Stations ) विमानतळाच्या धर्तीवर विकास करण्यात येणार होता. मात्र, गेल्या काही वर्षांपासून विकासाचे कामे रखडली आहेत. विशेष म्हणजे या स्थानकांच्या पुनर्विकास करण्यासाठी सुमारे ९४७ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळालेली आहे. मात्र, या निधीचा वापर अद्यापही होताना दिसून येत नाही. या १९ रेल्वे स्थानकांमध्ये मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील भांडुप, मुलुंड, ठाणे, डोंबिवली, शहाड, नेरळ आणि कसारा, असे एकूण ७ तर हार्बरवरील जीटीबी नगर, चेंबूर, गोवंडी, मानखुर्द, अशा चार स्थानकांचा समावेश आहेत. पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल, जोगेश्वरी, कांदिवली यासह एकूण ८ स्थानकांचा अशा एकूण १९ रेल्वे स्थानकांचा विकास करण्यात येणार आहे.