मुंबई- राज्यात गुरूवारी (२ सप्टेंबर) रोजी ४ हजार ३४२ नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. बुधवारी (दि. ३ सप्टेंबर) राज्यात १८३ मृत्यूची नोंद झाली होती, आज त्यात घट होऊन ५५ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातून आज ४ हजार ७५५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०४ टक्के इतका असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
राज्यात ५० हजार ६०७ सक्रिय रुग्ण
राज्यात ४ हजार ७५५ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६२ लाख ८१ हजार ९८५ कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०४ टक्के एवढे झाले आहे. राज्यात ४ हजार ३४२ नवीन रुग्णांचे निदान झाले असून ५५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण १ लाख ३७ हजार ५५१ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ४३ लाख २७ हजार ४६९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४ लाख ७३ हजार ६७४ (११.९२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ८७ हजार ३८५ व्यक्ती होम क्वारांटाईनमध्ये आहेत. राज्यात ५० हजार ६०७ सक्रिय रुग्ण आहेत.