महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्यात ५ हजार ६०० नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ, १११ रुग्णांचा मृत्यू - महाराष्ट्र कोरोना आकडेवारी

बुधवारी (दि. २ डिसेंबर) राज्यात ५ हजार ६०० नवीन कोरोनाग्रस्तांचे निदान झाले आहे. यामुळे राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा १८ लाख ३२ हजार १७६ वर पोहोचला आहे

कोरोना बातमी
कोरोना बातमी

By

Published : Dec 2, 2020, 9:59 PM IST

मुंबई - बुधवारी (दि. २ डिसेंबर) राज्यात ५ हजार ६०० नवीन कोरोनाग्रस्तांचे निदान झाले आहे. यामुळे राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा १८ लाख ३२ हजार १७६ वर पोहोचला आहे. राज्यात आज १११ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण ४७ हजार ३५७ रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.५८ टक्के एवढा आहे. सध्या राज्यात ८८ हजार ५३७ सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

८८ हजार ५३७ सक्रिय रुग्ण

राज्यात बुधवारी ५ हजार २७ रुग्ण बरे होऊन घरी, गेले असून आजपर्यंत एकूण १६ लाख ९५ हजार २०८ कोरोनाबाधित बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.५२ टक्के एवढे झाले आहे. राज्यात बुधवारी (दि. २ डिसेंबर) १११ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ९ लाख ८९ हजार ४९६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८ लाख ३२ हजार १७६ नमुने म्हणजेच १६.६७ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५ लाख ४७ हजार ७९१ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये तर ६ हजार ७३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत एकूण ८८ हजार ५३७ सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

कधी किती रुग्ण आढळून आले

राज्यात जून दरम्यान दिवसाला ५ हजार ४०० रुग्ण आढळून येत होते. टाळेबंदीमध्ये शिथिलता दिल्यावर रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात ही रुग्णसंख्या १० हजार ५०० वर गेली होती. सप्टेंबरच्या सुरुवातीला रुग्णसंख्या २० हजार ४०० वर गेली होती. सप्टेंबर महिना संपताना रुग्णसंख्या २४ हजार ८०० वर गेली होती. मात्र, ही रुग्णसंख्या गेल्या काही दिवसात कमी होत आहे. राज्यात १२ ऑक्टोबरला ७ हजार ८९ रुग्ण, १३ ऑक्टोबरला ८ हजार ५२२ रुग्ण आढळून आले होते. १९ ऑक्टोबरला ५ हजार ९८४ रुग्णांची, २६ ऑक्टोबरला ३ हजार ६४५, ७ नोव्हेंबरला ३ हजार ९५९, १० नोव्हेंबरला ३ हजार ७९१, १५ नोव्हेंबरला २ हजार ५४४, १६ नोव्हेंबरला २ हजार ५३५, १७ नोव्हेंबरला २ हजार ८४०, २० नोव्हेंबरला ५ हजार ६४०, तर २१ नोव्हेंबरला ५ हजार ७६० रुग्ण आढळून आले आहेत.

हेही वाचा -वस्त्यांची जातीवाचक नावे बदलण्याचा राज्य मंत्रीमंडळाचा निर्णय; सामाजिक न्याय विभागाने मांडला होता प्रस्ताव

हेही वाचा -सरकारचा मोठा निर्णय; सात जिल्ह्यातील तलाठी भरतीचा मार्ग मोकळा

ABOUT THE AUTHOR

...view details