महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्यात लॉकडाऊन काळात 524 सायबर गुन्ह्यांची नोंद, 273 आरोपींना अटक - राज्यात सायबर गुन्हे वाढले बातमी

कोरोनाला घेऊन अफवा, जातीय तेढ व कायदा सुव्यवस्था बिघडविण्यासाठी समाजकंटकांकडून सोशल माध्यमाचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. याप्रकरणी राज्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात 524 गुन्ह्यांची नोंद झाली असून याप्रकरणी 273 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

राज्यात लॉक डाऊन काळात 524 सायबर गुन्ह्यांची नोंद
राज्यात लॉक डाऊन काळात 524 सायबर गुन्ह्यांची नोंद

By

Published : Jul 7, 2020, 7:49 PM IST

मुंबई :राज्यात लॉकडाऊन लागू झाल्यापासून कोरोनाला घेऊन नागरिकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी सोशल माध्यमांवर काही असामाजिक तत्त्व परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचा व अफवा पसरविण्याचा प्रयत्न सध्या केला जात आहे. अशा समाजकंटकांच्या विरोधात राज्याच्या सायबर विभागाकडून मोठी कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत राज्यभरात लॉकडाऊनच्या काळात 524 गुन्ह्यांची नोंद झाली असून याप्रकरणी 273 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

लॉकडाऊन काळात राज्यभरात विवादास्पद वॉट्सअ‌ॅप पोस्ट फॉरवर्ड केल्याप्रकरणी 199 गुन्हे, फेसबुक पोस्ट प्रकरणी 220 गुन्हे दाखल झाले आहेत. तर, टिकटॉक व्हिडिओ शेअर प्रकरणी 28 गुन्हे दाखल झाले आहेत. ट्विटरद्वारे चुकीचे मजकूर पोस्ट केल्याप्रकरणी 12 गुन्हे दाखल झाले असून इंस्टाग्रामवर चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी 4 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. तर, ऑडिओ क्लिप, युट्युबसारख्या माध्यमांचा गैरवापर केल्याप्रकरणी 61 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

जिल्हावार दाखल सायबर गुन्ह्यांची नोंद

राज्यात बीड जिल्ह्यात सर्वाधिक 54 सायबर गुन्हे नोंदविण्यात आले असून त्यानंतर पुणे ग्रामीण विभागात 46, जळगाव 35, मुंबई 31, नाशिक ग्रामीण 18, कोल्हापूर 17, सांगली 18, बुलढाणा 15, ठाणे शहर 15, सातारा 14, जालना 14, नांदेड 13, नवी मुंबई 13, नाशिक शहर 13, अहमदनगर 13, ठाणे ग्रामीण 13, पालघर 11, लातूर 11, नागपूर शहर 11, परभणी 9, सिंधुदुर्ग 8, हिंगोली 8, अमरावती 8, चंद्रपूर 8, गोंदिया 7, सोलापूर ग्रामीण 5, पुणे शहर 5, रत्नागिरीत 5, सोलापूर शहर 5, नागपूर ग्रामीण 5, भंडारा 5, पिंपरी-चिंचवड 4, अमरावती ग्रामीण 4, धुळे 4, वर्धा 3, रायगड 2, वाशीम 2, नंदुरबार 2, उस्मानाबाद 2, औरंगाबाद 3, यवतमाळ 1, अकोला 3, औरंगाबाद ग्रामीण 1 एवढे गुन्हे नोंदविण्यात आलेले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details