मुंबई- महाराष्ट्र शनिवारी (दि. १७ जुलै) ८ हजार १७५ नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून १२४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आज ८ हजार ९५० रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.०४ टक्के एवढा आहे. गेले काही दिवस मृत्यूदर स्थिर आहे.
राज्यात १ लाख ४२९ सक्रिय रुग्ण
राज्यात आज ८ हजार ९५० रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ५९ लाख ७४ हजार ५९४ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.२८ टक्के एवढे झाले आहे. आज राज्यात ८ हजार १७२ नवीन रुग्णाांचे निदान झाले असून १२४ कोरोनाग्रस्तांच्या रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.०४ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४ कोटी ५२ लाख ६० हजार ४६८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६२ लाख ०५ हजार १९० (१३.७१टक्के) नमने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ७७ हजार ६१५ व्यक्ती होम क्वारांटाईनमध्ये आहेत तर ४ हजार १५६ व्यक्ती संस्थात्म क्वारांटाईनमध्ये आहेत. राज्यात सध्या एकूण १ लाख ४२९ सक्रिय रुग्ण आहेत.
या विभागात सर्वाधिक रुग्ण
मुंबई - ४६९
रायगड - ३६३
अहमदनगर - ५३२