मुंबई- राज्यात गुरुवारी (दि. 15 जुलै) रुग्णसंख्येत किंचित घट झाली असून ८ हजार १० रुग्णांची नोंद झाली आहे. तर १७० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदर २.०४ टक्के असून गेले काही दिवस तो स्थिर आहे. गुरुवारी ७ हजार ३९१ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली.
राज्यात १ लाख ७ हजार २०५ सक्रिय रुग्ण
गुरुवारी ७ हजार ३९१ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ५९ लाख ५२ हजार १९२ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.१७ टक्के एवढे झाले आहे. राज्यात आतापर्यंत एकूण १ लाख ७ हजार २०५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४ कोटी ४८ लाख २४ हजार २११ नमुन्यांपैकी ६१ लाख ८९ हजार २५७ (१३.८१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ८१ हजार २६६ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर ४ हजार ४७१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात एकूण १ लाख ७ हजार २०५ सक्रिय रुग्ण आहेत.
या विभागात सर्वाधिक रुग्ण
मुंबई - ५२८
रायगड - ३३४
अहमदनगर - ४१२