मुंबई- आरोग्य विभागाने केलेल्या उपाययोजनांमुळे राज्यात गेल्या वर्षीच्या मार्चपासून सुरू झालेला कोरोनाचा प्रसार काही प्रमाणात कमी झाला होता. मात्र नागरिकांकडून कोरोना संदर्भातील नियमांचे पालन केले जात नसल्याने रुग्णसंख्या वाढू लागली आहे. गेल्या काही दिवसात रुग्णसंख्या 6 हजाराच्या वर होती, 22 फेब्रुवारीला त्यात किंचित घट झाली होती. मात्र, त्यात पुन्हा मोठी वाढ झाली आहे. राज्यात आज तिसऱ्या दिवशीही 8 हजाराच्यावर रुग्णसंख्या आढळून आली आहे. 8333 नवीन रुग्ण आढळून आले आहेत तर 48 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
8333 नवीन रुग्ण -
आज राज्यात 8333 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 21 लाख 38 हजार 154 वर पोहचला आहे. तर आज 48 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 52 हजार 41 वर पोहचला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर 94.35 टक्के तर मृत्यूदर 2.43 टक्के आहे. राज्यात आज 4936 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आकडा 20 लाख 17 हजार 303 वर पोहचला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 61 लाख 12 हजार 519 नमुन्यांपैकी 21 लाख 38 हजार 154 नमुने म्हणजेच 13.27 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 3 लाख 18 हजार 707 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये असून 67 हजार 608 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
रुग्णसंख्या वाढली -
राज्यात दोन महिन्यानंतर पुन्हा रुग्णसंख्या वाढली आहे. राज्यात 11 डिसेंबरला 4268, 12 डिसेंबरला 4269, 16 डिसेंबरला 4304 रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर यात घट होऊन 2 ते 3 हजाराच्या आसपास रुग्ण आढळून येत होते. 14 फेब्रुवारीला 4092, 15 फेब्रुवारीला 3365, 16 फेब्रुवारीला 3663, 17 फेब्रुवारीला 4787, 18 फेब्रुवारीला 5427, 19 फेब्रुवारीला 6112, 20 फेब्रुवारीला 6281, 21 फेब्रुवारीला 6971, 22 फेब्रुवारीला 5210 रुग्ण आढळून आले होते. त्यात 23 फेब्रुवारीला किंचित वाढ होऊन 6218, 24 फेब्रुवारीला 8807, 25 फेब्रुवारीला 8702 तर आज 26 फेब्रुवारीला 8333 नवे रुग्ण आढळून आले आहेत.
या दिवशी सर्वात कमी रुग्णांची नोंद -