मुंबई- आज (दि. 13 मे) 1 हजार 946 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून 68 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज 2 हजार 37 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
रुग्ण दुपटीचा कालावधी 189 दिवस
मुंबई- आज (दि. 13 मे) 1 हजार 946 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून 68 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज 2 हजार 37 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
रुग्ण दुपटीचा कालावधी 189 दिवस
मुंबईत आज 1 हजार 946 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 6 लाख 84 हजार 48 वर पोहोचला आहे. आज 68 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 14 हजार 76 वर पोहोचला आहे. 2 हजार 037 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 6 लाख 29 हजार 410 वर पोहोचली आहे. मुंबईत सध्या 38 हजार 649 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 189 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 85 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेंनमेंट झोन (प्रतिबंधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर 432 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आज 30 हजार 886 तर आतापर्यंत एकूण 58 लाख 26 हजार 74 चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
हेही वाचा -मुंबईत ‘एम्फो टेरेसीन बी’ इंजेक्शनचा तुटवडा, आरोग्य विभागासमोर 'म्युकरमायकोसिस' आव्हान