मुंबई- मुंबईत 16 नोव्हेंबरला रुग्ण संख्या 409 पर्यंत खाली आली होती. गेल्या आठवडाभरात त्यात दुप्पटीहून अधिक वाढ झाली. बुधवारी (दि. 25 नोव्हेंबर) मुंबईत 1 हजार 144 नवे रुग्ण आढळून आले असून 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मुंबईत बुधवारी कोरोनाचे 1 हजार 144 नवे रुग्ण आढळून आले असून 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 लाख 78 हजार 590 वर पोहोचला आहे. तर, मृतांचा आकडा 10 हजार 723 वर पोहोचला आहे. मुंबईमधून बुधवारी (दि. 25 नोव्हेंबर) 701 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईत डिस्चार्ज देण्यात आलेल्यांचा आकडा 2 लाख 53 हजार 604 वर गेला आहे. सध्या मुंबईत 11 हजार 101 सक्रिय रुग्ण आहेत.
रुग्ण दुप्पटीचा कालावधी 201 दिवसांवर
मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 91 टक्क्यांवर पोहोचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 201, दिवस तर सरासरी दर 0.34 टक्के आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या 401 चाळी आणि झोपडपट्टी कंटेन्मेंट झोन (प्रतिबंधित क्षेत्र) घोषित करून सील करण्यात आल्या आहेत. तसेच 4 हजार 722 इमारती व इमारतीच्या विंग, काही मजले सील करण्यात आले आहेत. तर, कोरोनाचे निदान करण्यासाठी 18 लाख 17 हजार 232 इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.