मुंबई : मुंबईमध्ये सलग दुसऱ्या दिवशी शंभरहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे गेले तीन वर्ष कोरोना विषाणूचा प्रसार आहे, हा प्रसार काही प्रमाणात कमी झाला असतानाच मार्चपासून पुन्हा रुग्ण संख्या वाढू लागली आहे. 11 मार्चला 114 तर आज 12 मार्चला 101 रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात सलग दुसऱ्या दिवशी शंभरहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे.
राज्यात 101 नवे रुग्ण :आज 12 मार्च रोजी राज्यामध्ये 101 रुग्णांची नोंद झाली आहे. 36 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या 551 सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत राज्यात एकूण 81 लाख 38 हजार 437 रुग्णांची नोंद झालेली आहे त्यापैकी 79 लाख 89 हजार 462 रुग्ण बरे झाले आहेत. तर 1 लाख 48 हजार 424 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 12 मार्चला 114, 10 मार्चला 93, 9 मार्चला 90, 7 मार्चला 80 तर 3 मार्चला 66 रुग्णांची नोंद झाली होती.
मुंबईत आज 19 रुग्णांची नोंद :मुंबईत आज 12 मार्च रोजी 19 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या 111 सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या तीन वर्षात एकूण 11 लाख 55 हजार 525 रुग्णांची नोंद झाली आहे त्यापैकी 11 लाख 35 हजार 689 रुग्ण बरे झाले आहेत तर 19 हजार 747 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत 11 मार्चला 25, 10 मार्चला 21, 9 मार्चला 18 तर 2 मार्चला 18 रुग्णांची नोंद झाली होती.
रुग्णालयातील बेड रिक्त :कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी मुंबईमध्ये सध्या विविध रुग्णालयात 4350 खाटा उपलब्ध आहेत. त्यापैकी 6 खाटांवर रुग्ण दाखल आहेत. सध्या कोरोना रुग्णांना रुग्णालयात उपचारासाठी ऍडमिट करण्याची गरज भासत नाही. कोरोनाची रुग्णसंख्या वाढल्यास स्टँडबाय वर असलेली कोविड सेंटर सुरू करून तेथे रुग्णांवरती उपचार केले जातील अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
हेही वाचा - MLA Bunty Bhangdia : भाजप आमदार बंटी भांगडियांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल; काँग्रेस कार्यकर्त्यासोबत झाला वाद