मुंबई:मुंबईत सध्या रुग्ण बरे होण्याचा दर ९८ टक्के असून ३३२४ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्णसंख्या वाढल्याने मुंबईकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. गुरवारी ७०४ नवे रुग्ण नोंदवल्या गेले आहेत. तर १ मृत्यूची नोंद झाली आहे. ३४९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण १० लाख ६७ हजार २४५ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ४४ हजार ३५४ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ५६७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी १७६५ दिवस इतका आहे. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.०३९ टक्के इतका आहे. मुंबईत आज नोंद झालेल्या ७०४ रुग्णांपैकी ६७१ म्हणजेच ९५ टक्के रुग्ण लक्षणे नसलेले आहेत. मुंबईत रुग्णालयांमध्ये २४ हजार ४७३ बेड्स असून त्यापैकी ११४ बेडवर रुग्ण आहेत. मुंबईत ९९ टक्क्याहुन अधिक बेड रिक्त आहेत.